शिवसेना, मनसे, काँग्रेस मधील आजी माजी आमदार आणि नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

शिवसेना, मनसे, काँग्रेस मधील आजी माजी आमदार आणि नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

 

दोन माजी आमदार, तीन विद्यमान नगरसेवक आणि एक माजी नगरसेवक यांनी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

 

मुंबई दि. २३

माजी आमदार मंगेश सांगळे, माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्यासह सेना नगरसेविका लिना शुक्ला,  मनसेचे नगसेवक भालचंद्र आंबोरे, नगसेवक परविंदसिंग भामरा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक आणि ख्यातनाम अभिनेते दिलीप ताहील यांनी आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

 

मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरासाठी मुंबई महापालिकेच्या पारदर्शी कारभाराचा अजेंडा मांडला आहे त्यावर विश्वास ठेवत भाजपा मध्ये समाजाच्या विविध स्थरातून येऊन काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत त्यापैकीच दोन माजी आमदार, तीन विद्यमान नगरसेवक एक माजी नगरसेवक आणि अभिनेते दिलीप ताहील, लखनपाल, सोशल मिडियामध्ये काम करणारे प्रविण शेट्टी, एनआरआय गौतम गुप्ता यांनीही पक्षप्रवेश केला.

यावेळी मनसेचे विक्रोळी विभागातील माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपात प्रवेश केला. मंगेश सांगळे हे विक्रोळी कन्नमवार परिसरातून सुरूवातीला नगरसेवक त्यानंतर आमदार म्हणून निवडून आले होते. तर यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही पक्ष प्रवेश केला. दिवंगत शिवसेना नेते डॉ. रमेश प्रभू यांचे ते जावई असून विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. डॉ. प्रभू व त्यांचे कुटूंबीय आणि स्वाभाविक कृष्णा हेगडे यांचे कुटूंबीय हे हिंदुत्वाशी जोडलेले आहेत त्यामुळे त्यांचे पक्षात स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे असे आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या चांदिवली येथील विद्यमान नगरसेविका लिना शुक्ला, मनसेचे जोगेश्वरी येथील नगरसेवक भालचंद्र आंबोरे आणि मालाड येथील काँग्रेस नगरसेवक परविंदसिंग भामरा यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला. तर यावेळी शिवसेचे दीर्घावतीत माजी नगरसेवक आणि तत्कालीन आरोग्य समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. तर ख्यातनाम हिंदी सिने अभिनेते दिलीप ताहीर यांनीही मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना कृष्णा हेगडे म्हणाले की, एकीकडे भाजपाने पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेतला असताना काँग्रेसमध्ये म्हाडामधील भ्रष्ट कंत्राटदारांना तिकीटे देण्याचे काम सुरू आहे म्हणूनच मी या कारभाराला कंटाळून पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेणाऱ्या भाजपात प्रवेश केला आहे. तर मंगेश सांगळे म्हणाले की, मला राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करायची आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे करत असलेल्या कामाने मी प्रभावीत झालो आणि त्यांच्या देशहिताच्या कामात मलाही खारीचा वाटा उचलता यावा म्हणून मी आज भाजपात प्रवेश करत आहे. या पत्रकार परिषदेला आमदार प्रविण दरेकर, महापालिका गटनेते मनोज कोटक, भाजपा मुंबई उपाध्यक्ष भालचंद्र शिरसाट, नगरसेवक विनोद शेलार,  प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थीत होते.

दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले की, युतीबाबत आम्ही आश्वासक असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे अंतिम निर्णय घेतील. भाजपाचाही जाहीरनामा तयार आहे, युतीचा निर्णय झाल्यानंतर एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करावा असा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *