विक्रोळीतील कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते नारायण जर्नादन मोहिते यांचा भाजपा प्रवेश

विक्रोळीतील कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते नारायण जर्नादन मोहिते यांचा भाजपा प्रवेश

मुंबई, दि. 1 जानेवारी

विक्रोळी येथील कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते नारायण माहिते यांच्‍यासह शेकडो कार्यकर्त्‍यांनी  यांनी आज मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत भाजपामध्‍ये प्रवेश केला. मोहिते यांनी विक्रोळी कन्‍नमवार नगर मधून तीन वेळा कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती. 20 ते 25 वर्षावरून अधिक काळ ते निष्‍ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते म्‍हणून या भागात काम करीत आहेत.  आज झालेल्‍या पक्षप्रवेशाच्‍या वेळी, खासदार किरिट सोमय्या, भाजपा प्रदेश उपाध्‍यक्ष प्रसाद लाड,  मंगेश सांगळे, सुरेश सरनौबत, संजय यादवराव आदी उपस्थित होते.

भाजप मुंबई महापालिकेसाठी पारदर्शी अजेंडाच्‍या विषय घेऊन काम करते आहे. तसेच समाजतील दलित उपेक्षीत वर्गासाठी भाजपा हा एकमेव पक्ष काम करीत असून त्‍यामुळे आपण भाजपामध्‍ये प्रवेश केल्‍याचे मोहिते यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *