मुख्‍यमंत्र्यांच्‍या पहिल्‍याच भाषणाने काही जणांना नैराश्‍य

मुख्‍यमंत्र्यांच्‍या पहिल्‍याच भाषणाने काही जणांना नैराश्‍य

प्रदेश मुख्‍य प्रवक्‍ते माधव भांडारी

मुंबई, दि. 29 जानेवारी

वचननाम्‍यामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुखांच्‍या स्‍मारकाला विसरल्‍याने ज्‍यांची प्रतिमा आपल्‍याच कार्यर्त्‍यांच्‍या मनातूनात ढासळली त्‍यांनी आता उगाच मुख्‍यमंत्र्यांकडे बोट दाखवू नये, त्‍यांना तो अधिकार नाही, मुख्‍यमंत्र्यांच्‍या पहिल्‍या भाषणातच त्‍यांना नैराश्‍य आले आहे,  अशा शब्‍दात भाजपा प्रदेश  मुख्‍य प्रवक्‍ते माधव भांडारी यांनी पलटवार केला आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्‍या अडिच वर्षांच्‍या काळात जी सरकारची पारदर्शी प्रतिमा तयार केली आहे, ती जनतेला माहित आहे, असेही माधव भांडारी यांनी म्हटले आहे.

शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर जी टीका केली त्‍याला माधव भंडारी यांनी तेवढयाच कडक शब्‍दात उत्‍तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून ज्‍यांनी मराठी माणसाची मने दुखावली, तर शिवसेनाप्रमुखांना विसरून त्‍यांनी बाळासाहेब ठाकेर यांच्‍या चाहत्‍यांनाही दुखावले त्‍यांनी आज भाजपाच्‍या सभेला “ मालवणी दशावतार ‘ संबोधून मालवणी दशावतार कलेचा आणि मालवणी माणसाचाही  अपमान केला आहे.  मालवणी दशावतार ही कला मच्छिंद्र कांबळी यांच्‍यासारख्‍या कलाकारांना  आंतराष्‍ट्रीय स्‍थरावर नेली. त्‍याचा मालवणी माणसाला अभिमान आहे. अशा कलेची टिंगल करून त्‍यांनी हा अपमान केला आहे अशा शब्‍दात माधव भांडारी यांनी प्रतित्‍तर दिले आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्‍या सभेमध्‍ये पारदर्शी कारभाराचा अजेंडा मांडला. अत्‍यंत आक्रमकपणे आणि मुद्देसुदपणे मुख्‍यमंत्र्यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यामुळे भाजपाची पारदर्शी,  विकासाची भूमिका मुंबईकरांसामोर आली आहे. मुख्‍यमंत्र्यांच्‍या या भाषणला समाज माध्‍यमांमध्‍येही  जोरदार प्रतिसाद मिळाला त्‍यामुळे विरोधक पहिल्‍या चेंडूतच गारद झाले आहेत. त्‍यामुळेच त्‍यांनी आता मुख्‍यमंत्र्यांवर वैयक्‍तीक टीका टिपणी सुरू केली आहे. रणसुरू होण्‍या आधीच त्‍यांना नैराश्‍़य  आले असे दिसून येते आहे असेही माधव भांडारी यांनी म्हटले आहे.

शकुनीमानाचा कौरवांना पुन्‍हा हरवणार तर…

कुणाचेही नाव घेतले नसताना एकाच  व्‍यक्‍तीने शकुनीमामाची टोपी आपल्‍याच डोक्‍यात का बसवून घेतली आहे. शकुनीमामा त्‍यावेळीही कौरवांना पराभूत करून बसला व  आजही तेच काम करतो आहे. सामना चा पट असा रचला जातो आहे की ज्‍याचे फासे कधी ‘जाणताराजाच्‍या दिशेने पडतील तर कधी ‘कृष्‍ण्‍कुंजच्‍या दिशेने पडत आहेत. त्‍यामुळे याच शकुनीमामा मुळे कौरव पुन्‍हा पराभूत होणार असून त्‍याच दृष्‍ट्टीने हा मामा फासे टाकत आहे. अशा शब्‍दात माधव भांडारी यांनी जोरदार टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *