मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली घोषणा

मुंबई भाजपाची निवडणुक समिती जाहीर

 

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली घोषणा

 

मुंबई, दि. 15 जानेवारी

 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपाच्‍या 29 सदस्‍यीय निवडणुक समितीची घोषणा आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्‍यासह राज्‍याचे मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपाच्‍या प्रमुख पदाधिकाऱयांचा यामध्‍ये समावेश आहे.

मुंबई महापालिका निवडणुकाच्‍या तयारी, व्‍यवस्‍थापन, प्रचार साहित्‍य वाटप, प्रचारसभा तसचे उमेदवार निवड आणि जाहीरनामा प्रकाशनासह निवडणुकीतील सर्व कामाच्‍या दृष्‍टीने ही समिती महत्‍वाची मानली जाते. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्‍यामध्‍ये एकुण 29 सदस्यांचा समावेश आहे.

या समितीमध्‍ये संघटनमंत्री सुनिल कर्जतकर यांच्‍यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, विद्या ठाकूर, यांच्‍यासह खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पुनम महाजन तसेच आमदार अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा,भाई गिरकर, राज पुरोहित, योगेश सागर, मुंबई भाजपा महामंत्री सुनिल राणे, अमरजीत मिश्रा, सुमंत घैसास, महिला मोर्चा अध्‍यक्षा शलाका साळवी, महापालिका गटनेते मनोज कोटक या मुंबईच्‍या पदाधिकाऱयांसह प्रदेश उपाध्‍यक्ष आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शायना एन. सी., संजय उपाध्‍याय, संजय पांडे, तर प्रवक्‍ते म्‍हणून आमदार राम कदम, अतुल शाह, मधु चव्‍हाण, यांचा समावेश आहे तर प्रतापभाई आशर आणि कांताताई नलावडे या ज्‍येष्‍ठ सदस्यांचाही या समितीमध्‍ये समावेश आहे, अशी माहिती या समितीमधील प्रवक्‍ते माजी आमदार अतुल शाह यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *