मुंबईत 328 ठिकाणी “मन की बात चाय के साथ”

मुंबईत 328 ठिकाणी “मन की बात चाय के साथ”

कॅशलेस सोसायटीसाठी भाजपा युवा मोर्चा पुढाकार घेईल

–         मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून जनतेशी साधलेला संवाद सर्वसामान्‍यांना ऐकण्‍याची संधी उपलब्‍ध करीत सोबत चहा देऊन मुंबई भाजपाने आज मुंबईत 328 ठिकाणी “मन की बात चाय के साथ” हा उपक्रम राबविला.

मुंबई भाजपाच्‍या मन की बात चाय के साथ या उपक्रमाला आता जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत्‍ असून आज 328 ठिकाणी राबविलेल्‍या सर्वच उपक्रमात भाजपा पदाधिकाऱयांसह सामान्‍य मुंबईकर पंतप्रधानांचा संवाद ऐकण्‍यासाठी सहभागी झाले होते. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार हे दादर शिवाजी पार्क येथील कार्यक्रमास उपस्थित होते. तर शहरातील अन्‍य ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी, आमदार, नगरसेवक तसेच युवा मोर्चा आणि महिला मोर्चाचे पदाधिकारीही मोठया संख्‍येने उपस्थित होते. दादर येथील कार्यक्रमाचे आयोजन विलास आंबेकर,  राजेश शिरवडकर यांनी केले होते.

एक खास बनावटीची छत्री, बसण्‍यासाठी खुर्च्‍या आणि भाषण ऐकण्‍यासाठी लाऊड स्पिकर सोबत चहा अशा स्‍वरूपात हा उपक्रम राबविण्‍यात येतो. शहर विभागसह दोन्‍ही उपनगरातील प्रत्‍येक विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्‍यात आला. मालाड, कांदिवली,  बांद्रा पश्चिम, पूर्व, सांताक्रुझसह बांद्र स्‍टेशन परिसर, चेंबूर घाटला व्हिलेज, चेंबूर रेल्‍वे स्‍टेशन,  महाराष्‍ट्र नगर मानखुर्द,  चिता कॅम्‍प,  मागाठाणे,  बोरिवली, दहिसर  अशोक वन,  मुलुंड, भांडून,माटुंगा,  काळबादेवी,  गिरगाव या अशा सर्वच ठिकाणी हा उपक्रम राबविण्‍यात आला

दरम्‍यान,  पंतप्रधानांन कॅशलेस सोसायटी व्‍हावी यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले आहे. त्‍यानुसार भाजपाचे पदाधिकारी विशेषत भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते नागरीकांना कॅशलेस व्‍यवहाराचे प्रशिक्षण देण्‍याच्‍या कामात पुढाकार घेतील,  अशी ग्‍वाही यावेळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *