मुंबईतील गृहनिर्माण सोयायटयांसाठी वेगळे प्राधिकरण करणार

मुंबईतील गृहनिर्माण सोयायटयांसाठी वेगळे प्राधिकरण करणार

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या मागणीला सहकार मंत्र्यांकडून हिरवाकंदिल

 

मुंबई, दि. 16

नविन सहकार कायद्यानुसार राज्‍यातील सर्वच गृहनिर्माण सोसायटयांना निवडणुका घेणे बंधनकारक असले तरी त्‍यातून मुंबईतील गृहनिर्माण सोसायटयांचा वेगळा विचार व्‍हावा म्‍हणून त्‍यासाठी वेगळे प्राधिकरण तयार करण्‍याबाबत सरकार सकारत्‍मक आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत आज महाराष्‍ट्र सहाकरी संस्‍था तिसरी सुधारणा विधेयक क्रमांक 58 मंजूरीसाठी मांडण्‍यात आले होते. या विधेयकावर बोलताना मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदर अॅड आशिष शेलार यांनी मुंबईतील गृहनिर्माण सोसायटयांच्‍या विविध प्रश्‍नांकडे लक्षवेधले.

आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, 97 व्‍या घटना दुरूस्‍तीनंतर सर्वच गृहनिर्माण सोसायटयांना दरवर्षी हिशेब तपासणी करून त्‍याचा अहवाल निबंधकाला सादर करण्‍याचे सक्‍तीचे करण्‍यात आहे. हे काम आर्थिक वर्ष संपण्‍यापुर्वी करणेही बंधनकारक आहे. त्‍यासाठी सकारने हिशेबतपासणींसांचे पॅनल तयार करण्‍यात आले असून एका ऑडिटरकडे वीस सोसायटयांचे काम करण्‍याच सोपविण्‍यात आहे. मुंबईत सुमारे 22 हजार गृहनिर्माण सोसायटया असून त्‍यांना उपलब्‍ध करून देण्‍यात आलेल्‍या ऑडरची संख्‍या पाहता हे काम वेळेत पुर्ण होत नाही. त्‍याच प्रमाणे नव्‍या सहकार कायद्याने सोसायटयांची निवडणुक ही निबंधक कार्यालयामार्फत घेणे बंधनकारक करण्‍यात येत असली तरी त्‍याचीही अवस्‍था अशाच प्रकारे होणार आहे. मुंबईतील सुमारे 22 हजार गृनिर्माण सोसायटयांमधील 200 हून अधिक सदस्य असलेल्‍या सोसायटयांची संख्‍या ही 3 हजार असून 200 पेक्षा कमी सभासद असलेल्‍या सोसायटयांची संख्‍या ही  सुमारे 19 हजार आहे. एवढया मोठया प्रमाणात सोसायटयांचे वेळेत निवणुक प्रक्रिया पुर्ण करायची झाल्‍यास त्‍यासाठी आवश्‍यक असणारा कर्मचारी वर्ग निबंधक कार्यालयाकडे नाही. तसेच त्‍यासाठीचा खर्च सोसायटीने करवा असेही बंधनकारक आहे त्‍यातून रहिवाशांमध्येमध्‍ये नाराजीचा सूर आहे. त्‍यासोबतच सोसायटी सदस्यांना प्रशिक्षण देणेही बंधनकारक करण्‍यात आले आहे. एक तर मुंबईतील माणसाचे जिवन धावपळीचे आहे. अशावेळी सोसायटीच्या कामाची जबाबदारी कोणी घेण्‍यास तयार होत नाही. त्‍यातच पुन्‍हा निवडणुका, प्रशिक्षण आणि त्‍यासाठी करावी लागणारी कायदेशीर प्रक्रिया यासाठी वेळ देणे शक्‍य होत नाही. त्‍यामुळे या संपुर्ण प्रक्रियेतमध्‍ये काही सुवर्णमध्‍ये साधता येतो का याचा विचार सरकारने करावा अशी मागणी करीत. निवडणुक प्रक्रियेची जुनी पध्‍दत आणि नवी पध्‍दत यातही काही सुवर्ण मध्‍य साधता येतो का याबाबत ही विचार करावा अशी मागणी यावेळी आमदार अॅड आाशिष शेलार यांनी करीत मुंबईसाठी वेगळा विचार करीत गृहनिर्माण सोसायटीसाठी वेगळे प्राधिकरण तयार करण्‍यात यावी अशी मागणी केली.

तसेच मुंबईमध्‍ये काही भागात विविध जाती धर्माच्‍या लोकांनी एकत्र येऊन काही सोसायटया बांधल्‍या आहेत. या गृहनिर्माण सोसायटया जुन्‍या असून त्‍यांचा बायलॉजही मंजूर आहे. यामध्‍ये बांद्रा पश्चिम विभागात 18 हजार इमारतींची एक सोसायटी असून या सोसायटीमध्‍ये सर्व सदस्य हे ख्रिच्चन आहेत. तसेच मुंबईत काही भागात पारसी, दलित अशा विविध समाज घटकांनी एकत्र येऊन पुर्वी गृहनिर्माण सोसायटी तयार केल्‍या. आता या सोसायटयांमध्‍ये अन्‍य जाती धर्माच्‍या माणसांना घरे देण्‍यात यावी म्‍हणून त्‍यांच्‍या बायलॉजमधे बदल करण्‍याची सक्‍ती करण्‍यात येत आहे. काहीजण आपल्‍या स्‍वार्थासाठी जातीय सलोखा बिघडवत तेढ निर्माण करीत आहेत. हे घटनेच्‍या विरोधात आहे. यासाठी जुन्‍या सोसायटयांच्‍या अशा बायलॉजचे संरक्षण करण्‍याबाबत शासनाने अभ्‍यास करून उपाय योजना करावी, अशी मागणीही यावेळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी केली.

या सर्व मागण्‍या अंत्‍यत महत्‍वाच्‍या असून आपण त्‍यांच्‍याशी सहमत आहोत असे सांगत या चर्चेला उत्‍तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, राज्‍यातील अन्‍य सहाकरी संस्‍था आणि गृहनिर्माण सोयायटया यांना वेगळे करण्‍याची गरज आहे. त्‍यासाठी विशेषत: मुंबईसाठी वेगळे गृहनिमाण प्राधिकरण तयार करण्‍यातबाबत शासन सकारात्‍मक आहे. तसेच निवडणुका आणि प्रशिक्षणासाठी अतिरिक्‍त कर्मचारी वर्ग उपलब्‍ध करून देण्‍यात येईल अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली. तर जाती धर्माच्‍या एकत्र असणाऱया गृहनिर्माण सोसायटयांच्‍या हिताचे रक्षण करण्‍याबाबत ही सरकार अभ्‍यास करून सकरात्‍मक भूमिका उपाय करेल, अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली. या चर्चेत आमदार पराग अळवणी यांनी ही गृहनिर्माण सोसायट्यांची बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *