नोटा बंदीच्या विषयात विरोधकांची पळकुटी भूमिका

नोटा बंदीच्या विषयात विरोधकांची पळकुटी भूमिका

–    मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार

 

नागपूर दि. ५ – विरोधकांना नोट बंदी बाबत सामन्यांच्या अडचणी मांडण्यापेक्षा राजकारण करण्यातच जास्त रस असल्यामुळे सरकार चर्चा करायला तयार असतानाही त्यांनी पळकुटी भूमिका घेतली असा आरोप  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज केला.

विधानभवनाच्या आवारात इलेक्ट्रोनिक माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, नोट बंदी बाबत राज्य सरकारने केलेल्या उपयोजना या जास्तच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या देश हिताच्या निर्णयाचे जनतेने स्वागतच केले आहे. मात्र आज नियमात बसत नसतानाही विरोधी पक्षाने याबाबत विधानसभेत चर्चा उपस्थित केली. सरकार याबाबत सविस्तर चर्चा करायला आणि उत्तर द्यायला तयार होते, त्यानिमित्ताने जनतेच्या अडचणी सरकार समोर मांडण्याची संधी होती. मात्र विरोधकांना राजकारण करण्यातच रस होता म्हणून त्यांनी पळकुटी भूमिका घेतली असा आरोप आशिष शेलार यानीं केला.

सरकारने याकाळात शेतकऱ्याला अडचण होऊ नये म्हणून बि-बियाण्यांच्या खरेदी मध्ये जुन्या नोटा चालवण्याचा निर्णय घेतला, तर शेतकऱ्यांनी जुन्या नोटा बँकेत भरायला सुरुवात केल्यावर त्या नोटा व्याजाची परतफेड असल्याचे गृहीत धरून जमा करण्यास सुरुवात केली. याबाबतही तत्काळ मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन बँकांना निर्देश दिले. तर टोल नाक्यांवर टोल वसुली बंद ठेवण्यात आली, तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात आले, तर नोटा वहनासाठी पोलीस व संबंधित यंत्रणा उपलब्ध केली. मायक्रो एटीएम सुरु करण्यात आले, दवाखान्यांमध्ये जुन्या नोटा चालविण्याचे निर्देश दिले अशा अनेक उपयोजना या सरकारने केल्या ज्यातून जनतेला दिलासा देण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत होते. असेही आमदार आशिष शेलार यांनी विशद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *