उद्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून भाजप च्या प्रचाराचा नारळ वाढवणार

उद्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून भाजप च्या प्रचाराचा नारळ वाढवणार

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधणार

मुंबई दि. ४ फेब्रुवारी

मुंबई महापालिकेच्या निवडणूकीतील भाजाप  चे सर्व उमेदवार उद्या दुपारी २.०० वाजता हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला  अभिवादन करून त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात पारदर्शी भष्टाचार मुक्त कारभाराची शपथ घेणार आहेत. याच मेळाव्यात उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते भाजप च्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात येईल.

मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज दादर वसंत स्मृती येथे पत्रकार परिषद घेऊन भाजप च्या उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रचार रणनितीची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ज्या भागात निवडणूका आहेत त्या भागातील सर्व जनतेला भाजप च्या  जाहिरनाम्याबाबात आपल्या अपेक्षा आणि सुचना पाठवा असे आवाहन सोशल मिडीयावरून केले होते त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे सहा लाखाहून अधिक सुचना आल्या आहेत. त्या सर्व सुचनांचा विचार करून भाजप चा जाहिरनामा तयार करण्यात येतो आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील निवडणूक क्षेत्रातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि सुचना जाणून घेणार आहेत. त्यांचा भाजपच्या जाहिरनाम्यात समावेश केला जाणार आहे.

उद्या रविवार दि. ५ फेब्रूवारी दुपारी २.०० वा. मुंबई भाजप आणि मित्रपक्षाचे  मुंबईतील २२७ उमेदवार हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे उमेदवारांचा मेळावा होणार असून  या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील उमेदवारांना संबोधीत करतील. त्यानंतर या कार्यक्रमातच मुंबईकरांना पारदर्शी  आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार याची शपथ देण्यात येणार आहे.

दरम्यान याबाबत बोलताना मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, काही जणांनी स्वयंघोषित प्रचाराला सुरूवात केली तर काही जणांना शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा विसर पडला. काही जण छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिवादन करायला विसरले. भाजप मात्र हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून मुंबई करांना पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्याची शपथ घेऊन आपल्या प्रचाराला सुरूवात करेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *