इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍मारकाच्‍या कार्यक्रमावर बहिष्‍कार टाकरणाऱयांना निवडणुकीत धडा शिकवा

इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍मारकाच्‍या कार्यक्रमावर बहिष्‍कार टाकरणाऱयांना निवडणुकीत धडा शिकवा

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांचे आवाहन

मुंबई, दि. 29

ज्‍यांनी नामांतरणाला विरोध केला त्‍यांनीच इंदू मिलमधील भारतरत्‍न  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्‍मारकाच्‍या भूमिपूजनाच्‍या कार्यक्रमावर बहिष्‍कार टाकला होता हे आंबेडकरी जनता विसरलेली नाही. अशा पक्षाला महापालिका निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असे प्रतिपादन मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केले.

भाजपाच्‍या अनुसूचित जाती मोर्चातर्फे आज दादर येथे कार्यकर्ता मेळावा आमदार विजय भाई गिरकर यांच्‍या पुढाकाराने आयोजित करण्‍यात आला होता. या मेळाव्‍याला भाजपाचे संघटनमंत्री सुनिल कर्जतकर, प्रदेश उपाध्‍यक्ष प्रसाद लाड यांच्‍यासह  अशोक कांबळे, शरद कांबळे, विठ्ठल खरटमोल, विजय गोयलकर, शरयु जाधव अादी उपस्थित होते.

यावेळी आपल्‍या भाषणात आमदार भाई गिरकर म्‍हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात जास्‍त सन्‍मान  या देशातील आणि राज्‍यातील भाजपा सरकारनेच केला आहे. तर एवढेच नव्‍हे तर शिवशक्‍ती आणि भिमशक्‍तीची हाक सेनेने दिली पण रिपाइंचे अध्‍यक्ष रामदास आठवले यांचा सन्‍मान राखला नाही. त्‍यांचाही सन्‍मान भाजपानेच केला असून त्‍यांना खासदार करून केंद्रात मंत्री पद देऊन भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचाराने काम करणाऱया कार्यकर्त्‍याचा सन्‍मान केला.

यावेळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, या देशाला राज्‍य घटना देण्‍याचे काम ज्‍यांनी केले त्‍या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत हरविण्‍याचे काम कॉंग्रेसने केले. त्‍यांनतर त्‍यांच्‍या स्‍मारकाची पंधरा वर्षे केवळ आश्‍वासनेच दिली. तर  शिवसेनेने नामांतरणाला विरोध केला. इंदू मिल येथे आंतरार्ष्‍टीय दर्जाचे महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे स्‍मारकाचा भूमिपूजन समारंभ झाला त्‍यावर बहिष्‍कार टाकण्‍याचे कामही सेनेने केले. मुंबईत अण्‍णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्‍यास सेनेच्‍या महापौरांनी विरोध केला.   या घटना हा बहुजन समाज विसरलेला नाही. त्‍याचे उत्‍तर महापालिका निवडणुकीत हा समाज देईल, असेही ते म्‍हणाले. तसेच भाजपा सरकारने बहुजन समाजासाठी हाती घेतलेल्‍या विविध योजना कार्यक्रम यांचाही त्‍यांनी यावेळी उहापोह केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Current day month [email protected] *